लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या अंध, अपंग, मुकबधिर विद्यार्थी व नागरिकांना पीएमपी मोफत बसपासेससाठीच्या सुमारे ३ कोटी २५ लाख ६४ हजार रुपयांच्या खर्चा सह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ११ कोटी ९७ लाख २६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. सेक्टर क्र. १० व से. क्र. १२ टाकी वरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात वितरण नलिका टाकणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४० लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.आरोग्य विभागाकरिता ४.५ घनमीटर क्षमता बीन्स कंटेनर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३६ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ६१ दापोडी मुख्य रस्त्याचे कडेने पावसाळी गटरसाठी पाईपलाईन टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ लाख ४९ हजार रुपये, आरोग्य विभागास एकूण ५६२ नग स्टेनलेस स्टिल हॅगिंग लिटरबीन्स खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १ कोटी ६४ लाख ६६ हजार रुपये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातील अर्ज सादर केलेल्या अंध, अपंग, मुकबधिर विद्यार्थी व नागरिकांना पीएमपी मोफत बसपासेस पोटी अदा करण्यात येणाऱ्या सुमारे ३ कोटी २५ लाख ६४ हजार रुपयाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.पालिकेच्या रुगणालयातील एक्स-रे विभागातील डी. आर. सिस्टिम करिता तातडीने आवश्यक लागणाऱ्या डी. आर. फिल्म खरेदीसाठी २६ लाख ०७ हजार रुपये, क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कचरा गोळा करून मोशी कचरा डेपो येथे वाहतूक करून टाकण्यासाठी ४ कोटी ५५ लाख २३ हजार रुपये खर्चास मान्यता दिली.
अकरा कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By admin | Published: May 12, 2017 5:15 AM