पिंपरी : भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यापासून दौऱ्यांवर उधळपट्टी सुरू आहे. आग्रा, लखनौ या शहरांच्या धर्तीवर चिंचवडगाव परिसराचा विकास करण्यात यावा. त्यासाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह महापालिका अधिकारी व पदाधिकाºयांनी नुकताच चोरी चुपके आग्रा व लखनौ पाहणी दौरा केला़ त्यासाठीच्या अडीच लाखाच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर अभ्यास दौºयांच्या नावाखाली उधळपट्टी सुरू आहे. महापालिका ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिंचवडगाव आहे. परिसरामध्ये महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतिवीर चापेकर यांचा वाडा, श्री मंगलमूर्ती वाडा आदी ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तू आहेत. या परिसराची ही पार्श्वभूमी पाहता हेरिटेज वॉकच्या धर्तीवर रिव्हर व्हिव्यू हॉटेल ते श्री मंगलमूर्ती वाडा, तसेच चापेकर चौकापर्यंत सुशोभीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा आणि लखनौ या ऐतिहासिक शहरांचा याच धर्तीवर विकास आणि सुशोभीकरण केले आहे. या धर्तीवर चिंचवडगाव परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी आग्रा आणि लखनौ येथील विकसित केलेल्या हेरिटेज वॉक आणि शहर सुशोभीकरणाची पाहणी पालिकेतर्फे २४, २५ नोव्हेंबरला केली. या दौºयामध्ये चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह नगरसेवक, स्वीकृत सदस्य, महापालिका शहर अभियंता अंबादास चव्हाण, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील सहभागी झाले होते.आधी दौरा, मग मान्यताचोरी चुपके दौरा झाल्यानंतर खर्चाचा विषय मान्यतेसाठी आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ‘आधी दौरा, मग मान्यता,’ हा भाजपाचा पारदर्शक कारभार उजेडात आणला होता. त्यावर टीकाही झाली होती. आमदारांसह पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी, पदाधिकाºयांनी नुकताच चोरी चुपके दौºयाच्या खर्चास कार्योत्तर मान्यता देण्याचा विषय महापालिका स्थायी समितीसमोर आला होता. त्यास मान्यता दिली आहे.
लपूनछपून केलेल्या सहलीच्या खर्चास ‘स्थायी’ची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 2:32 AM