लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपाइं (आठवले गट) ची भाजपासोबत युती होती. पंरतु, युती असतानाही पिंपरी विधानसभेची गणित डोळ्यासमोर ठेवून संभाव्य उमेदवारांनी फिल्डिंग लावून चंद्रकांता सोनकांबळे यांना पराभूत केले. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी संधी न देता रिपाइंची फसवणूक केली, असा आरोप रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात के. एम. बुक्तर यांनी म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीत रिपाइंला १० तिकिटे देण्याचे निश्चित झाले होते. परंतु, भाजपाने ऐनवेळी तीनच तिकिटे रिपाइंला दिल्या. भोसरी मतदारसंघात रिपाइंला एकही जागा देण्यात आली नाही. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे वेगवेगळे नेते असल्याचे सांगत सर्वांच्या पाठीमागे पळण्यास भाग पाडले. तीन जागांमधील एकच जागा निवडून आली.
स्वीकृत नगरसेवक निवडीत फसवणूक
By admin | Published: May 13, 2017 4:32 AM