पिंपरी : महापालिकेच्या काही विभागांमार्फत प्रशासन विभागाच्या संमतीशिवाय धोरणात्मक आदेश काढले जात आहेत. मात्र, प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय कोणत्याही विभागांनी यापुढे परस्पर धोरणात्मक आदेश काढू नयेत, असा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.पालिका प्रशासन विभागामार्फत कामकाजाच्या आवश्यकतेनुसार, प्रशासकीय व धोरणात्मक निर्णय घेऊन आदेश किंवा परिपत्रके जारी करण्यात येतात. हे आदेश जारी करताना विषयाचे गांभीर्य, आवश्यकता आणि दूरगामी परिणाम विचारात घेऊन परिपूर्ण आदेश किंवा परिपत्रक काढण्याची कार्यवाही प्रशासन विभागामार्फत करण्यात येते. तथापि, महापालिकेच्या काही विभागांमार्फत प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय परस्पर धोरणात्मक आदेश काढण्यात येतात. त्यामध्ये स्थानांतरण, कामकाज वाटप, अधिकार प्रदान आदी विषयांचा समावेश असतो.
प्रशासकीय यंत्रणेला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:05 AM