रहाटणी : एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला. ५७ किलो मॅटवरील उद्घाटनाच्या सामन्यात पै. कुणाल जाधवने पै. शुभम शिंदेला बांगडी डावावर चितपट करुन विजय मिळविला. ९७ किलो गटात मातीवर झालेल्या चित्तवेधक लढतीत पै. आदेश नाणेकरने पै. संकेत धाडगेला ६ विरुद्ध ० गुणांनी पराभूत करुन विजय मिळविला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते दि. २४ डिसेंबर २०१७ ला भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत रविवारी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पै. दामुअण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:04 PM
एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला.
ठळक मुद्दे१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते २४ डिसेंबरला होणार भूगाव येथेपै. दामुअण्णा काटे, पै. भरत कुंजीर यांचा अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान