पिंपरी: डोळे नसतानाही डोळसपणे आयुष्य जगता यावे, पोटाची भूक भागावी, कलेला दाद मिळावी आणि भाकरीचा चंद्रही मिळावा, यासाठी अंध व्यक्तींनी कलामंचाची स्थापना केली. पण त्यांना व्यासपीठ मिळाले नाही. रस्त्यावर गायन करून त्यांना पोटापुरता पसाही मिळत नाही. त्यामुळे पोटापुरता पसा पाहिजे, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अंध म्हणून रस्त्यावर फिरण्यापेक्षा १९७० मध्ये लिंबराज सूर्यवंशी यांनी सूरताल एकजीवन संगीत मंडळाची स्थापना केली. पंचशील अंध मित्र मंडळाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या मंडळातील अंध व्यक्तींनी एकत्र येऊन गायनाचे कार्यक्रम सुरू केले. त्यातून रोजी-रोटीची व्यवस्था झाली. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत त्यांनी अनेक अंध व्यक्तींच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला.आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहे. गावच्या यात्रा, जयंती, ठिकठिकाणचे आठवडे बाजार यामध्ये ते गायनाचे कार्यक्रम घेतात. दर वर्षीच्या पंढरपूर वारीमध्ये त्यांचा सहभाग असतो. मात्र अलीकडे कार्यक्रम मिळत नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर गाण्याची वेळ आली आहे.रस्त्यावर कार्यक्रम घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उन्हात कार्यक्रम घेत असल्यामुळे बहुधा लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कार्यक्रमाचा खर्चही निघत नाही. बºयाच वेळा वाहतूक पोलिसांकडून कार्यक्रम घेण्यास नकार दिला जातो. त्यामुळे चौकात कोठेतरी एका बाजूला कार्यक्रम घेतात. शासनाने अशा स्वाभिमानी जीवन जगणाºया दिव्यांगांसाठी एखादा हक्काचा मंच उपलब्ध करून देण्याची मागणी या कलाकारांची आहे. त्याचबरोबर नागरिकांनीदेखील सामाजिक बांधिलकी व दिव्यांगांच्या जगण्याला हातभार म्हणून त्यांना कार्यक्रमाची संधी देण्याची आवश्यकता आहे.४या मंडळाच्या माध्यमातून गाण्यांचे कार्यक्रम घेणाºया व्यक्तींना रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासनाचा मदतीचा हात नाही. केवळ ठिकठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करूनच ते पोट भरत असतात. संगीत मंडळ चालविण्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणावर येतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांना टेम्पो भाड्याने घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे गायनसाथीसाठी लागणारी वाद्ये, साउंड सिस्टीम यांचाही देखभाल खर्च करावा लागतो. त्यामुळे एखादा कार्यक्रम भेटला, तरी बराचसा खर्च यावरच होत असल्यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून रस्त्यावर येऊन या अंध व्यक्ती कला सादर करीत आहेत. त्यातून संध्याकाळच्या भाकरीचा प्रश्न सुटावा आणि एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचीही संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याची माहिती मंडळातील कलाकारांनी दिली.सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आमची कला सादर करण्यासाठी आम्हाला रंगमंच उपलब्ध करून दिला पाहिजे. आमच्याकडे जगण्यासाठी दुसरे कोणतेच साधन नाही. आता कार्यक्रम भेटत नसल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.- दत्ता भालेराव, पेटी मास्तर, सुरताल एकजीवन संगीत मंडळ
कलाकारांना हवाय पोटापुरता पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 4:04 AM