पिंपरी : तुमच्या मुलीला नोकरी लावतो तसेच मुखमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून एक कोटीचे कर्ज मंजूर करून देतो, असे अमिष दाखवून महिलेची चार लाख तीन हजार २४० रुपयांची फसवणूक केली. ही घटना आठ मे २०२३ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणी महिलेने तळेगवा दाभाडे पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजेश चव्हाण (रा.चिंचवड) याच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी महिला आणि तिच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून एक कोटीचे कर्ज देण्याचे अमिष दाखवले. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी यांच्याकडून चार लाख तीन हजार २४० रुपये घेतले. मात्र, प्रत्यक्षात कर्ज मंजूर करून न देता तसेच फिर्यादीच्या मुलीला नोकरी न लावता फसवणूक केली.