पिंपरी : रागाने का पाहतो, असे विचारले म्हणून दारूची बाटली तरुणाच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.२६) आकुर्डी येथे घडली. या प्रकरणी शंकर बाबा पांडवे (वय २४, रा.आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी घनश्याम माणिक शिवरकर (४९, रा.खापरी मोरेश्वर, जि.नागपूर) यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर व त्यांचे मित्र पुष्कर मोकळ्या जागेत दारू पीत बसले होते. त्यावेळी संशयित घनश्याम हा त्यांच्याकडे रागाने बघत जात होता. फिर्यादी शंकर याने संशयित घनश्याम याला रागाने का बघतोस म्हणून विचारले. त्याचा राग आल्याने संशयित घनश्याम याने पडलेली काचेची बाटली उचलून तुला संपवतोच म्हणत शंकर यांच्या मानेवर, डोक्यावर व चेहऱ्यावर मारून जखमी केले.