लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शासनाकडून प्रतिनियुक्तीवर महापालिका सेवेत असलेले सहायक आयुक्त मीनिनाथ दंडवते यांची लातूर नगरपालिकेत उपायुक्त म्हणून तर चंद्रकांत खोसे यांची जळगाव नगरपालिकेत उपायुक्त म्हणून शनिवारी बदली झाली आहे. खोसे यांच्या जागी कोल्हापूर महापालिकेतील उपायुक्त विजय एकनाथ खोराटे यांची नियुक्ती झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत २६ आॅगस्ट २०१४ ला सहायक आयुक्त म्हणून मीनिनाथ दंडवते रुजू झाले होते. त्यांच्याकडे भूमी जिंदगी, सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृह आणि आरोग्य विभागाचा पदभार होता. शनिवारी त्यांची लातूर महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. चंद्र्रकांत खोसे १७ नोव्हेंबर २०१४ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले होते. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक व सुरक्षा विभाग होता. तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभारही त्यांच्याकडे होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ११ सहायक आयुक्त आहेत. त्यापैकी राज्य सरकारच्या सेवेतील ६ आणि पालिका सेवेतील ५ सहायक आयुक्त आहेत. राज्य सरकारच्या सेवेतील सहा आयुक्त होते. त्यापैकी तिघांच्या बदल्या झाल्या आहेत. आरोग्य विभागाचे मीनिनाथ दंडवते आणि चंद्र्रकांत खोसे यांची बदली झाली आहे. तर, निवडणूक विभागाचे यशवंत माने यांची तीन महिन्यांपूर्वीच बदली झाली असून त्यांच्या जागी अद्याप कोणी आले नाही.सहायक आयुक्तांची दोन पदे रिक्त राज्य शासनाने महापालिकेत प्रतिनियुक्तीवर यापूर्वी पाठविलेले प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश डोईफोडे, क्रीडा विभागाचे योगेश कडूसकर आणि भांडार विभागाचे प्रवीण अष्टीकर हे महापालिकेत सध्या कार्यरत आहेत. खोसे यांच्या जागी विजय खोराटे आले असून यशवंत माने यांच्या जागी अद्यापपर्यंत कोणीच आले नाही. प्रतिनियुक्तीवरील दोन सहायक आयुक्तांची पदे रिक्त आहेत.
सहायक आयुक्त दंडवते, खोसेंची बदली
By admin | Published: July 02, 2017 2:46 AM