पुणे : स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असणाऱ्या व्यक्तींना आता पाचव्या व्यवहारापासून एटीएमसाठी सेवाकरासह जवळपास २३ रुपये मोजावे लागतील. इतकेच काय तर पुरेसे पैसे शिल्लक नसतील आणि एटीएमचा वापर केला तरीही असे शुल्क तुमच्या खात्यातून वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय धनादेश, एनईएफटी, आरटीजीएस, बचत खात्यात देखील पैसे भरण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार असून, खात्यात किमान १ ते ५ हजार रुपये सरासरी रक्कमही आता अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व कॅशलेस व्यवहार धोरण म्हणून स्वीकारले आहे. यापुढे सर्व व्यवहारांची नोंद होण्यासाठी बँक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या व्यवहारासाठी आता भरभक्कम शुल्क मोजण्याची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे. आता बँकेतून आपलेच पैसे काढण्यासाठी अथवा आॅनलाइन व्यवहारांसाठी आपला ‘ई खिसा’ रिता करावा लागणार आहे. खातेदारांना आपल्या खात्यात किमान रक्कम ठेवावी लागणार आहे. मुंबईसारख्या महानगरात महिना सरासरी ५ हजार रक्कम ठेवावी लागणार आहे. अन्यथा, जितकी रक्कम कमी होईल त्या प्रमाणात ५० ते शंभर रुपये शुल्क आकारण्यात येईल. शहरी भागात ३ हजारांची रक्कम ठेवणे बंधनकारक असून, अन्यथा ४० ते ८० रुपयांचा दंड होईल. निम्नशहरी भागात २, तर ग्रामीण भागात १ हजार रुपये ठेवावे लागतील. निम्नशहरी भागात २५ ते ७५ आणि ग्रामीण भागात २० ते ५० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) केल्यास १० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत २ ते १२ रुपयांचे शुल्क असून, सेवा शुल्क अतिरिक्त आकारण्यात येईल. बचत खात्यात महिन्याला केवळ तीनदाच विनाशुल्क पैसे भरता येतील. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे भरल्यास प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. डेबिट कार्डवरून त्रयस्थ खात्यात व्यवहार केल्यास त्यासाठी २२ रुपये मोजावे लागतील. प्रत्येकाला दरमहा चार एटीएम व्यवहार विनामूल्य असतील. त्यापुढील व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. बँक व्यवहारांच्या या प्रत्येक शुल्कावर साडेचौदा टक्के सेवा शुल्क आकारला जात असल्याने, त्या प्रमाणात शुल्काची रक्कमदेखील वाढणार आहे. याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आरबीआयच्या गव्हर्नरला पत्र लिहिले आहे. बँक खात्यात आता प्रत्येक खातेदारालाच किमान रक्कम ठेवणे अनिवार्य आहे. त्याखाली रक्कम गेल्यास दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय एटीएमच्या पाचव्या व्यवहारापासूनही भरमसाठ शुल्क आकारले जाणार आहे. आपलेच पैसे काढण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याऐवजी छळवणूकच सुरू झाली आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचशहरी भागात ३ हजारांची रक्कम ठेवणे बंधनकारक असून, अन्यथा ४० ते ८० रुपयांचा दंड होईल. निम्नशहरी भागात २, तर ग्रामीण भागात १ हजार रुपये ठेवावे लागतील. >प्रत्येकाला दरमहा चार एटीएम व्यवहार विनामूल्य असतील. त्यापुढील व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) केल्यास १० हजार ते एक लाख रुपयापर्यंत २ ते १२ रुपयांचे शुल्क डेबिट कार्डवरून त्रयस्थ खात्यात व्यवहार केल्यास २२ रुपये शुल्क
एटीएमचा व्यवहार २३ रुपयांचा भुर्दंड
By admin | Published: March 07, 2017 12:57 AM