पिंपरी : लग्नास नकार दिल्याने महिलेला धमकावले. तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे येथे १५ जुलै २०२१ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. २) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दत्ता अंकुश वाशिवले (रा. कोथरूड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीला लग्नास स्पष्ट नकार दिला असतानाही, आरोपीने फिर्यादीचा वारंवार पाठलाग केला. फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी व घरी येऊन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. मला आयुष्यात तूच हवी आहे, मी तुझ्या वाचून राहू शकत नाही, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला धमकावले. तसेच फिर्यादीच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.