पिंपरी : भक्ती-शक्ती, निगडी ते प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी दरम्यान मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. य्मतदार जनजागृतीचे पथनाट्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापक सहभागी झाले.मतदार दिनानिमित्त मतदार नोंदणीसाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार महेश पाटील, पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार स्नेहा चाबुकस्वार, तसेच सुषमा पैकीकरी व अंजली सावंत यांचा सत्कार केला.आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये शुभम पोरे, डॉ. डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय-आकुर्डी आणि दिव्या कुलकर्णी, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना प्रथम क्रमांक विभागून मिळविला. हर्षदा वाबळे (अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय) व ज्ञानेश्वर भंडारे (प्रा. मोरे महाविद्यालय) यांना द्वितीय क्रमांक आणि प्रतीकराज बान, (प्रतिभा कॉलेज-चिंचवड) आणि पूजा डफळ (प्रा. मोरे महाविद्यालय) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. व्यंगचित्र स्पर्धेत प्रा. मोरे महाविद्यालयाचा कुऱ्हाडे यमनूर व प्रतिभा कॉलेजची कवडे ज्योती यांना प्रथम क्रमांक, प्रा. मोरे महाविद्यालयाचा अभिषेक बैसाणे व इंदिरा कॉलेज, वाकडची वृधी चोणकर यांना द्वितीय क्रमांक व अश्रृत वाघमारे व मधुरा शंकरपुरे या पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. कोलाज स्पर्धेमध्ये प्रतीक्षा हगवणे (प्रा. मोरे) प्रथम धनश्री भागवतकर (प्रतिभा) आणि काजल कांबळीचा तृतीय क्रमांक आला. (प्रतिनिधी)
मतदार दिवसानिमित्त प्रबोधन फेरीतून जागृती
By admin | Published: January 26, 2017 12:23 AM