पिंपरी : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या वतीने बुधवारी (दि. ९) चिंचवड येथील प्रतिभा शिक्षण संकुलामध्ये प्रा. डॉ. अशोक पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली चौथे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे यांनी दिली. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे साहित्य संमेलन दरसाल घेतले जाते.सकाळी १० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या वेळी १८व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध विचारवंत प्रा. जे. पी. देसाई आणि स्वागताध्यक्ष डॉ. दीपक शहा हे उपस्थित असतील. त्यानंतर ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षेखाली काव्यक्रांती कविसंमेलन होईल. त्यामध्ये चंद्रकांत वानखेडे, अनुजा कल्याणकर, मीना शिंदे, मधुश्री ओव्हाळ, चंद्रकांत धस, भाग्यश्री कुलकर्णी, अशोक कोठारी, दत्तू ठोकळे, अनिल दीक्षित आणि संगीता झिंजुरके यांचा सहभाग राहील. त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होतील. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांची प्रकट मुलाखत होईल.
बंधूता साहित्य संमेलन ९ आॅगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:20 AM