शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

सावधान! दररोज होतेय २९ जणांचे बँक खाते रिकामे; सायबर भामट्यांकडून फसवणूक

By रोशन मोरे | Published: May 27, 2023 5:06 PM

ऑनलाईन पैसे पाठवण्यापासून कामाच्या नव्या संधी शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे.

पिंपरी : ऑनलाईन भामटे नवनवे मार्ग वापरून नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करून त्यांचे बँक खातेच रिकामे करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात २४ एप्रिल ते २४ मे या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ८७९ ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातून सरासरी दिवसाला २९ ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन पैसे पाठवण्यापासून कामाच्या नव्या संधी शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे. या संधीचा फायदा घेत सायबर चोरटे लिंक पाठवून नागरिकांना मधाळ बोलण्यात गुंतवून तर कधी कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून ओटीपी घेऊन त्यांचे बँक खाते रिकामे करत आहेत. प्रत्येकवेळी नवी पद्धत वापरून फसवणूक होत आहे.ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार

सायबर चोरट्यांकडून नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्यासाठी विविध प्रकाराचा वापर केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने केवायसी अपडेटच्या बहाण्याने लिंक पाठवणे, ज्येष्ठांना मदत करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन ऑनलाईन पासवर्ड मिळवणे, गिफ्ट पाठवल्याचे असून ते कस्टममध्ये अडकल्याचे सांगून लाखो रुपये उकळणे, व्हिडीओला लाईक शेअर करण्यास सांगून ‘टास्क फ्राॅड’ करणे, मेट्रोमोनिअल साईटचा वापर करून खोट्या प्रोफाईलद्वारे प्रेमाचे नाटक करून पैसे उकळणे, सेक्सटोर्शनद्वारे बदनामीची धमकी देऊन पैसे घेणे आदी माध्यमातून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते.लाईक, शेअरमुळे आयटीयन्सचे लाखोंचे नुकसान

सायबर शाखेकडे येणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये ‘टास्क फ्रॉड’चे प्रमाण अधिक आहे. कामाचे टास्क देऊन त्यातून गुंतवणुकीचे अथवा टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे. एका आयटीतील मॅनेजरने या टास्क फ्रॉडला भुलून तब्बल ५७ लाख रुपये गमावले तर, एका तरुणीने आपल्या बँक खात्यातील २४ लाख रुपये सायबर भामट्यांच्या बँक खात्यावर पाठवले. हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, सायबर भामट्यांना बळी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे आयटीयन्सचे आहे. जर दिवसाला २९ ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले तर त्यात फसवल्या गेलेल्या आयटीयन्सचे प्रमाण हे ९० टक्के असते.अधिक कमाईचा हव्यास

महिन्याला लाखो रुपये कमविणारे आयटीयन्स सायबर चोरट्यांचे शिकार ठरत आहेत. याविषयी आयटीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अधिक कमाईचा हव्यास हा आयटीयन्सच्या मुळावर उठत आहेत. एक-दोन तास काम करून जास्त पैसा मिळेल या आमिषापोटी ते सायबर चोरट्यांनी पाठविलेल्या लिंक ओपन करून त्यांच्या जाळ्यात अडकून लाखो रुपये गमावतात.मनुष्यबळाची कमतरता

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना सायबर सेलसाठी असणारे मनुष्यबळ मात्र अपुरे आहे. सायबर सेलचे स्वतंत्र पोलिस ठाणे होण्यासाठी सरकारकडे पोलिस आयुक्तालयाकडून प्रस्ताव पाठविला गेला आहे. त्याचा पाठपुरावा देखील केला जात आहे. मात्र, स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही.सायबर सेलमध्ये सध्या असलेले मनुष्यबळ

पीआय - एकएपीआय - तीनकर्मचारी - १८सायबर सेलमध्ये आवश्यक मनुष्यबळ

अधिकारी - पाचकर्मचारी - ७५ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात बँक खाते, संबंधित क्रमांक मिळून येतो. मात्र, टेलिग्रामसारखे माध्यम स्वायत्त असल्याने त्याद्वारे होणारी फसवणूक ही व्यक्तीकडून होते की ‘एआय’च्या माध्यमातून होते, हे शोधणे आव्हानात्मक असते. टेलिग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमातून पैसे भरून नोकरी लागत नाही, याचे भान आयटीयन्सला असणे आवश्यक आहे.- संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी