लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : ‘लोकनेते माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे कार्य त्यांच्या स्मारकाच्या रूपाने जनतेसमोर राहील. जिल्ह्यातील उत्कृष्ट स्मारक मंचर येथे तयार केले जाईल,’ असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे मंचर येथील स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी खासदार आढळराव पाटील यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच दत्ता गांजाळे, युवराज बाणखेले, जे. के. थोरात, अश्विनी शेटे, कैलास बाणखेले, अरुण लोंढे, डॉ. मंगेश बाणखेले, लक्ष्मण गांजाळे, कैलास गांजाळे, बाळासाहेब बाणखेले, मीराताई बाणखेले, दत्ता थोरात, वसंतराव बाणखेले, राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, सुरेश भोर, अरुणनाना बाणखेले आदी उपस्थित होते. खासदार आढळराव पाटील यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली.
‘स्मारकाच्या रूपाने बाणखेले यांचे कार्य जनतेसमोर’
By admin | Published: May 10, 2017 4:03 AM