- विश्वास मोरेपिंपरी - महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ योजने अंतर्गत ‘पॅनसिटी’आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सीटी नेटवर्क, वायफाय, सिटी कीआॅक्स, सिटी सर्व्हिलन्स, पिण्याचे पाणी, वाहतूक सेवा स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे दोनशे कोटींना मंजुरी दिली आहे. मूलभूत सुविधा सक्षमीकरण आणि सुरक्षिततेवर भर देण्यात येणार आहे. मूलभूत सेवा स्मार्ट सेवांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात वाहनतळ पार्किंग पॉलिसी, रस्ते खोदाई अशी विविध धोरणे आणण्यात येणार आहेत. वर्षापूर्वी शहराचा समावेश स्मार्ट सिटीत होऊन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना झाली आहे. मात्र, विकासकामांना वेग मिळालेला नाही. नियोजनात स्मार्ट सिटी आघाडीवर राहिली आहे. तर कार्यवाही अंमलबजावणीत पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅनसिटीचा आराखडा तयार केला आहे. वर्षभर सर्व आराखडे कागदावरच होते. केंद्राकडून निधी मिळल्याने महापालिकेने पॅनसिटी आराखडा तयार कला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यात विविध सेवांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. नागरिकांना सक्षम सेवा देण्याचा प्रमुख उद्देश त्यात आहे. शहरातील नागरी जीवन सुखकर होण्यासाठी आराखड्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.स्मार्ट वाहतुकीसाठी शहरामध्ये ९५ ठिकाणी ही सुविधा प्राप्त होणार असून सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक असणार आहे. तसेच शहरामध्ये स्मार्ट पार्किंग केले जाणार आहे. शहरात तीन टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे. पार्किंगचे आॅनलाइन बुकिंग सेवाही देण्यात येणार आहे. तसेच शहरातील वीज दिवे हे स्वयंचलित असणार असून, पथ दिवे स्वयंचलित व मध्यवर्ती नियंत्रित करणेत येणार आहेत. पर्यावरणासंदर्भातही स्वंतत्र यंत्रणा कार्यान्वित असणार आहे. पर्यावरणाची गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच मीडिया अॅनेलिसीसमधून नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पांकरिता आपली मते, अभिप्राय देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देणे शक्य होणार आहे.पॅनसिटीत मोबाइल अॅप तयार करण्यात येणार असून, त्यात नागरिकांना शहराची माहिती सह शहरातील इतर विविध सेवा सुविधांची माहिती असणार आहे. तसेच नागरी सुविधांसंदर्भात मतेही नोंदविता येणार आहेत. तसेच सिटी आॅपरेशन सेंटरमधून स्मार्ट सिटी अंतर्गत उक्त नमूद केलेल्या विविध प्रकल्प उदा़ सिटी सर्व्हिलन्स आणि स्मार्ट वाहतुकीसाठी देखरेख करण्यास हा विभाग कार्यरत असेल. अॅपच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा सुविधाही देण्यात येणार आहेत.सिटी कीआॅक्स उभारणार ५० ठिकाणी४सिटी कीआॅक्ससाठी शहरातील ५० ठिकाणे निवडण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी आणि तक्रारींकरिता (सारथी) दररोज उपयोगात आणले जाणार आहे. त्यातून नागरी प्रश्न सोडविण्यासाठी परिणामकारकपणे प्रयत्न केले जाणार आहेत.दोनशे सत्तर ठिकाणी वायफाय४माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे डिजिटलवर भर दिला जाणार आहे. शहरातील दोनशे सत्तर ठिकाणी वायफाय करण्यात येणार आहे. इनडोअर आणि आऊटडोअर अशी सुविधा असणार आहे. त्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.साडेसातशे किमीच्या वाहिन्या४सिटी नेटवर्क अंतर्गत शहरातील विविध भागांत नेटवर्किंगसाठी साडेसातशे किलोमीटर अंतरावर वाहिन्या केबल टाकण्यात येणार आहे. फायबर आॅप्टिक केबल टाकण्यात येणार आहे. त्यातून सिटी नेटवर्क तयार करण्यात येणार आहे.सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची नजर४शहरातील वाढती गुन्हेगारी व सुरक्षेच्या उपाययोजनाही स्मार्ट सिटीत केल्या जात आहेत. शहरातील तीनशे प्रमुख ठिकाणांची निवड महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केली आहे. त्याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे शहरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.नागरिकांसाठी शुद्ध अन् नियमित पाणी४पाणी व्यवस्थापनातही स्मार्टनेस आणण्यात येणार आहे. दररोज नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याची क्षमता तसेच पाण्याची घनता तपासण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. प्राप्त होणार आहे. तसेच स्मार्ट मीटर अंतर्गत दूषित पाण्याची विल्हेवाट करावयाची पद्धत अवलंबता येणार आहे. चोवीस तास आणि मुबलक पाणीही देण्यात येणार आहे.
पॅनसिटीतून मूलभूत सेवा होणार ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:32 AM