शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

भोसरीत लांडे-लांडगेंमध्ये वर्चस्वाची लढाई

By admin | Published: April 05, 2016 12:49 AM

गावकी आणि भावकीच्या राजकारणाचा अनुभव भोसरीकरांना नवा नाही. ‘दहा गावे दुसरी, तर एक गाव भोसरी’ असे म्हटले जाते.

भोसरी : गावकी आणि भावकीच्या राजकारणाचा अनुभव भोसरीकरांना नवा नाही. ‘दहा गावे दुसरी, तर एक गाव भोसरी’ असे म्हटले जाते. याच गावात विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यात वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यामध्ये कार्यकर्ते व समर्थकांची ससेहोलपट होत आहे.भोजापूर म्हणून ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या भोसरीत गावकी-भावकीच्या राजकारणाचा प्रभाव आहे. येथील राजकारण नेहमी स्थानिकांभोवतीच फिरत राहिले आहे. राजकीय संधी मिळताच शह आणि काटशह देण्याची संधी येथील नेते सोडत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे. गेल्या दहा वर्षांत या गावात मामा आणि भाचेजावयामधील राजकीय चढाओढ शहरवासीयांसाठी कुतूहलाचा विषय राहिलेली आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या तालमीत तयार झालेल्या विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे. वरकरणी मामा-भाचे भांडत नसले, तरी त्यांच्या समर्थकांत मात्र नेहमीच धुसफूस सुरू असते. (वार्ताहर)पहले आप धोरणआमदार महेश लांडगे हे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. मात्र, विधानसभेत त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. विजयीही झाले. निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादीशी असणारा घरोबा तोडलेला नाही. दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जवळीक कायम ठेवली आहे. ते नक्की राष्ट्रवादीचे, की भाजपाचे हे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतीलच स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने लांडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वाकडून न्याय मिळत नसल्याने लांडगेसमर्थक तीव्र नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. तेही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही नेते ठोस निर्णय घेत नसल्याने या दोघांच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. राष्ट्रवादीतील नाराजी दूर करण्याचे आव्हान सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. सत्तारूढ पक्षनेत्या आणि महापौर बदलाची मागणी करून माजी आमदार विलास लांडे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘न्याय न दिल्यास वेगळा मार्ग स्वीकारू’ असा इशाराच लांडे गटाने दिला आहे. पक्षनेत्या आणि पक्षातील अन्य स्थानिक नेत्यांच्या मनमानीविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली आहे. त्यामुळे नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.भाजपाकडून गळभोसरी विधानसभेतील लांडे किंवा लांडगे असे दोन्हीही मोहरे भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दोन्हींपैकी एकास आपल्या पक्षात खेचण्यासाठी भाजपाचे नेते उत्सुक आहेत. मात्र, लांडगे आणि लांडे हे दोन्हीपैकी एकानेही अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. दोघेही एकमेकांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यामुळे भाजपाच्या गळाला कोण लागणार, ही केवळ चर्चा ठरली.