शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आजारांपासून काळजी घ्या; रुग्णसंख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 2:23 AM

शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेच्या व खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची तुडुंब गर्दी पाहयला मिळत आहे. साथीच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या जीवघेण्या साथीच्या आजारांमध्ये मलेरियाचा ही समावेश होत असल्याने त्यापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत २० रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक ८ रुग्णांना मलेरियाची लागण झाली होती. प्लाझमोडियम या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजते. थंडीचा कालावधी पंधरा मिनिटे ते तासभर असतो. दुपारनंतर ताप येतो व घाम येऊन तो कमी होतो. त्याबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशी लक्षणे जाणवतात.मलेरिया या आजाराची नुकतीच लागण झाली असेल तर ही लक्षणे सौम्य असतात. त्यामध्ये सुरुवातीस फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. रक्तनमुना तपासल्याशिवाय मलेरिया या आजाराची लागण झाली आहे की नाही याचा निर्णय घेणे अवघड असते. त्यामुळे लक्षणे वाटल्यास रक्त चाचणी करून घेणे आवश्यक आहे.मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्लाझमोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जाण्याची व दगवण्याची शक्यता असते. काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात. या गंभीर आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णांला त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते.शहर परिसरामध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. स्वाइन फ्लूसारख्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लू व डेंगी यांचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने व त्याची लागण गर्भवती स्त्रिया व लहान मुले, तसेच वयोवृद्ध व हृदयरोग असणाऱ्या लोकांना जीवघेणी ठरत असल्याने त्यांना योग्य उपचार, तसेच टॅमी फ्लूच्या गोळ्या या वेळेत चालू होणे महत्त्वाचे आहे. या विषयी तसेच टॅमी फ्लूचे औषधोपचार सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती दिली जात आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत़ मात्र याकडे दुर्लक्ष केले तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांवर उपचार केला जातो. थंडीताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे.आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रणाणे सोसायटी व घराजवळील पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडले पाहिजे. जेणेकरून हिवताप पसरवणाºया डासांची उत्पत्ती होणार नाही. परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे. रुग्णांमध्ये मलेरिया या आजाराची लक्षणे वाटल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य