पिंपरी : पिंपरीत मंगळवारी(दि.२९ मे) पहाटे तीनच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतुक करणारे वाहन पकडले. यावेळी पिंपरी पोलिसांच्या मदतीने सहा टन गोमांस जप्त करण्यात आले . महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित कलमानुसार, गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवशंकर स्वामी ( मानद पशुकल्याण अधिकारी ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन अहमदनगर येथून गायी व बैल कापून त्यांचे मांस मुंबई येथे मांस विक्रीसाठी जात होते. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर वाहन थांबविण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची सर्व माहिती देत पोलिसांची मदत मागितली. टेम्पो व चालक यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी ड्रायव्हर अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद इंद्राशी याच्याकडे चौकशी केली असता त्याने अहमदनगर येथून गायी व बैल कापून टेम्पोत भरून मुंबई येथील गनी भाई याच्याकडे घेऊन जात आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या समक्ष पशुवैधकीय अधिकारी डॉ. देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी वाहनाची तपासणी केली असता गायी व बैलांचे मांस आढळले. पिंपरी पोलीस ठाण्याचे आर.आर. ठुबल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांकडून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:44 PM
सहा टन गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतुक करणारे वाहन पकडले