पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी नागरिकांकडून एकूण ८ हजार ३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील लाभार्थींना या योजनांचा लाभ ३१ मार्च २०१६अखेर मिळेल. नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत २४ विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात गरजूंना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, त्यास सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. पालिका हद्दीतील नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा, पात्र अर्जदार योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी आयुक्त राजीव जाधव यांनी मुदतवाढ दिली.
योजनांचा लाभ ३१ मार्चपर्यंत
By admin | Published: December 27, 2015 2:05 AM