पिंपरी: पिंपरी चिंचवडसह मावळ, मुळशी परिसरामध्ये दिवसभर अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात वेगाने वाढ होत आहे. पवना आणि मुळा नदीची पाणी पातळी वाढली आहे. दुपारपासून पवना धरणातून १४००, मुळशीतून साडेपाच हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पवनाकाठच्या चिंचवड केशवनगर भागामध्ये नागरी वसाहतीमध्ये पाणी घुसले आहे. पिंपरीत भिंत कोसळली आहे. सांगवी आणि बोपखेल मधील नदीकाठच्या भागात पाणी शिरले आहे. काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
पिंपरी -चिंचवड आणि मावळ, मुळशी गेल्या तीन दिवसांपासून सलगपणे पिंपरी -चिंचवड आणि मावळ, मुळशी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. दुपारी पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी एक वाजता मुळशीतून २५०० आणि पवनातून १४०० क्युसेक पाणी सोडले आहे. सायंकाळी मुशीतून पाच हजार क्युसेक पाणी सोडले आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. केशवनगर चिंचवड परिसरातील पोतदार स्कूलच्या परिसरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. घरकुल परिसरामध्ये काही भागांमध्ये पाणी घुसले आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. एक पूल बंद केला आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७० टकके क्षमतेने भरले आहे. पवना धरण क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर व पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी साठा नियंत्रित करणेकरिता लवकरच पवना जलविद्युत केंद्रामधून विसर्ग वाढविला आहे. मंदी कठच्या कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रातील पंप, गुरे, अवजारे अथवा तत्सम साहित्य, जनावरे तात्काळ हलविण्यात यावित. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
विद्युत खांबांवर कोसळून काही गाड्यांचे नुकसान
राज्यामध्ये येत असलेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीमुळे, उद्या दि.२६ जुलै २०२४ रोजी, निगडी पुणे येथे होणारी "फळे व भाजीपाला निर्यात परिषद" पुढे ढकलली आहे. बिर्ला समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदी धोकादायक पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक थांबविली असून, शेजारच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली आहे. भाजप कार्यालय समोरील मैदानाची सुरक्षा भिंत पाण्याच्या लोंढ्या मुळे शेजारच्या विद्युत खांबांवर कोसळून काही गाड्यांचे नुकसान, व वीज पुरवठा खंडीत झाला आहे.