पिंपरी : औद्योगिकनगरीच्या प्रवेशद्वारावर प्राधिकरणातील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकात उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार मार्गाचे काम सुरू आहे. पन्नास टक्के काम पूर्ण झाले असून, २०१९ मध्ये हा प्रकल्प पूर्ण कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे भक्ती-शक्ती हा चौक सिग्नल फ्री होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून प्राधिकरणातील भक्तीशक्ती चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न गाजत आहे. प्रवेशद्वारावरच वाहतूककोंडी हा विषय शहरासाठी टीकेचा झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबविली. या कामाची मुदत डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत आहे. प्रकल्पासाठी एकूण ९० कोटी ५३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी १७ खांब उभारले आहेत.हॉटेल पुणे गेट ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंत ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पूल असणार आहे. पुलाची लांबी साडेआठशे मीटर असून, उंची साडेआठ मीटर आहे. प्राधिकरणातून भोसरी, पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल उभारण्यात येत आहे. त्याची लांबी तीनशे चाळीस मीटर आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा चौक सिग्नल फ्री होणार आहे.महामार्गास समांतर ग्रेडसेप्रेटरस्पाईन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटरही होत आहे. ये-जा करणाºया वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. त्यामुळे प्राधिकरण व मोशी हा दक्षिण व उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडले जाणार आहे. त्याची लांबी साडेचारशे मीटर व रुंदी २४ मीटर आहे. नाशिक महामार्गावरून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेड सेपरेटरमधून ये-जा करू शकतील. वर्तुळाकार पूल हा साठ मीटर व्यासाचा आहे. तीन लेनच्या मार्गांची रुंदी साडेपंधरा मीटर आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गास समांतर असा एकसष्ट मीटर रुंदीच्या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे.मुदतपूर्व कामाचा प्रयत्नगेल्या वर्षी जून महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. कामाची मुदत तीस महिने आहे. स्थापत्य कामासाठी ७२ कोटी खर्च आहे. वाहिन्या स्थलांतरासाठी अठरा कोटी खर्च आहे. तसेच विद्युतविषयक कामाचा खर्च वेगळा आहे. या प्रकल्पात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्ता अशी कामे होणार आहेत. उड्डाणपुलाच्या कामात महावितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीचा प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे एका खांबाचे काम थांबले आहे. वाहिनी स्थलांतराचे काम तातडीने पूर्ण झाल्यास काम मुदतीपूर्वी होऊ शकते.