पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुडीर्तील एका महाविद्यालयात क्वारंटाईन केंद्र उभारले आहे. यावरून भाजपा विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. नागरी भागात केंद्र उभारताना सुरक्षा चोख असावी, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतली आहे. ज्या भागातील रूग्ण असतील त्याच भागात क्वारंटाईन केंद्र उभारावे, क्वारंटाईन केंद्र हे भाजपाने सुरू केले आहे, असा आरोप केला जात आहे, अशी भूमिका भाजपाने मांडली आहे. क्वारंटाईन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सजग नागरिक पहारा देत असताना माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शिवसेना नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. त्यावेळी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस देऊन सोडून दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुडीर्तील एका महाविद्यालयात क्वारंटाईन केंद्र उभारले आहे. या केंद्रावरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. भाजपाच्या वतीने माजी उपमहापौर शैैलजा मोरे, शिक्षण समितीच्या माजी उपसभापती शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, अनुम मोरे, राष्टÑवादीच्या वतीने माजी उपमहापौर राजू मिसाळ, शिवसेनेच्या वतीने अमित गावडे यांनी नागरी सुरक्षेसाठी नाका सुरू केला होता. या नाक्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे.सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, प्राधिकरणातील क्वारंटाईन केंद्र भाजपामुळे सुरू झाले आहे. असा आरोप विरोधक करीत आहेत. वास्तविक उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने केंद्र उभारली आहेत. त्यात पक्षाचा संबंध नाही. क्वारंटाईन केंद्र उभारताना ज्या भागातील रूग्ण असतील तेथील जवळच्या भागातच उभारण्याची गरज आहे.माजी महापौर राजू मिसाळ म्हणाले,क्वारंटाईन केंद्र भाजपाने सुरू केले असे आमचे मत नाही. महापालिकेत सत्ता भाजपाची आहे. क्वारंटाईन केंद्र कोठे असावे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनास सांगायला हवे होते. प्रभाग अध्यक्षांनाही न विचारता प्रशासनाने केंद्र सुरू केले हा त्यांचा विषय आहे. ही प्रशासनाचीही चूक आहे. शिवसेनेचे नगरसेवक अमीत गावडे म्हणाले, प्राधिकरण ग्रीन झोन आहे. केंद्रावर सध्या अनेक रूग्णांचे नातेवाईक येत आहेत. येथील सुरक्षेचा विचार करावा. केंद्राला विरोध नाही. परंतु प्राधिकरणात रूग्ण वाढणार नाही, याबाबत दक्षता प्रशासनाने घ्यावी.....................नगरसेवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीसक्वारंटाईन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सजग नागरिक पहारा देत असताना माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शिवसेना नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. त्यावेळी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस देऊन सोडून दिले.