पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे गड म्हणून परिचित असणाऱ्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसघांवर भाजपाने दावा केला आहे. धनुष्यबाणाचे वर्चस्व असणाºया मतदारसंघात कमळ फुलविण्याचा निर्धार चिंचवड येथील बैठकीत शुक्रवारी करण्यात आला आहे.मावळ आणि शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक चिंचवड येथे झाली. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, विजय काळे, सुरेश हळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबूराव पाचारणे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, आझम पानसरे, उमा खापरे उपस्थित होत्या.आतापर्यंत मावळ आणि शिरूरमधून भाजपाला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आगामी निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, ‘‘आगामी लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे. या ईर्ष्येने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. भाजपाचे खासदार निवडून आणून मित्रपक्ष शिवसेनेला आपली ताकत दाखवून द्यावी.’’>पिंपरी-चिंचवड शहरात जे पिकते ते राज्यभर खपते, अशी धारणा झाली आहे. येथून राज्याची राजकीय हवा लक्षात येते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीतून फुटावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार तीन नोव्हेंबरला प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघातून आजपर्यंत भाजपाला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. येणाºया निवडणुकीत भाजपाचे कार्यकर्ते मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आपली ताकत दाखवून देतील.- लक्ष्मण जगताप,शहराध्यक्ष व आमदार, भाजपा
शिवसेनेच्या जागांवर भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 2:04 AM