पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक १७ मधील लढत चुरशीची असून, चार गटांतून एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. तीन गटांतून प्रत्येकी सहा, एका गटातून पाच उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, शिवसेना अशी लढत असणार आहे. महापालिकेची रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. प्रभाग १७ मध्ये वाल्हेकरवाडी गावठाणाचा काही भाग, आहेरनगर, रजनीगंधा, विवेकानंद सोसायटी, चिंचवडेनगर, भोईरनगर, दळवीनगर, बिजलीनगर या परिसराचा समावेश आहे. संमिश्र मतदार या प्रभागात आहे. अ गटातून भाजपाकडून प्रदेश पदाधिकारी नामदेव ढाके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, काँग्रेसकडून चिंतामणी सोंडकर, मनसेकडून अक्षय नाळे रिंगणात आहेत, तर ब गटातून राष्ट्रवादीच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांची पत्नी शोभा वाल्हेकर, शिवसेनेच्या वतीने माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांची पत्नी मंगल वाल्हेकर, भाजपाच्या वतीने माधुरी कुलकर्णी, तर क गटातून राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेविका आशा सूर्यवंशी, शिवसेनेकडून माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांची पत्नी रजनी वाघ, भारतीय जनता पक्षाकडून करुणा चिंचवडे आणि ड गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, भाजपाकडून सचिन चिंचवडे, शिवसेनेकडून बाळासाहेब वाल्हेकर आणि मनसेकडून दत्तराम लोकरे रिंगणात आहेत. प्रमुख पक्षांचे १३, तर उर्वरित उमेदवार अपक्ष आहेत. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीविरूद्ध भाजपाची लढत
By admin | Published: February 15, 2017 2:15 AM