महापालिका निवडणूकीत भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षांतील जुन्या नव्यांचा वाद उफाळून आला आहे. शहरातील १२८ पैकी दोन जागांवर भाजपाने अर्ज मागे घेऊन अपक्षांना पुरस्कृत केले आहे.
गवळीनगर प्रभागातील पºहाड यांनी भाजपाकडून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे एबी फॉर्म देखील सादर केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना भाजपाच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली, असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. दरम्यान निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला जात आहे. आमदारांच्या भावासाठी पºहाड यांचा बळी दिला आहे, अशी चर्चा भोसरी विधानसभात मतदार संघात आहे. आमदार बंधू सचिन लांडगे हे भाजप पुरस्कृत उमेदवार झाले आहेत.
रवी लांडगे बिनविरोध
भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतने प्रभाग क्रमांक सहामधून उमेदवारासाठी रवी लांडगे इच्छुक होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी भोसरी विधानसभेतील भाजपाच्या नेतृत्वावर थेट टीका करून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केली होती. अंकुश लांडगेंच्या खून्याला भाजपातून उमेदवारी दिली जात आहे. ती देऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे उमेदवारीवरून भोसरीत दोन गट असल्याची चर्चा सुरू होती. रवी लांडगे यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर या प्रभागातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेने उमेदवार दिले नव्हते. रवी लांडगेंना सहानुभूती मिळावा, यासाठी अंकुश लांडगे यांच्या जुन्या मित्रांनी येथून पक्षांची उमेदवार दिले नाहीत. तसेच आमदार लांडगे यांनीच बिवविरोधची खेळी खेळल्याचीही चर्चा भोसरीत आहे.
चिंचवडला झामा बारणेंना सेफ
थेरगावातील प्रभागातून राष्टÑवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदार लक्ष्मण जगताप समर्थक झामा बारणे यांनी भाजपात प्रवेश केला. याच प्रभागातून भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेश्मा बारणे यांनी आश्चर्यकारकपणे माघार घेतली आहे. बारणे यांना भाजपा पुरस्कृत करण्याची चर्चा आहे.