शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

भाजपाच्या सहा नगरसेवकांचे पद धोक्यात, जात पडताळणी प्रमाणपत्र : २२ आॅगस्टला मुदत संपणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:52 AM

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी २२ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे दोनच दिवस शिल्लक राहिले असून त्या मुदतीत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेची ...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी २२ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे दोनच दिवस शिल्लक राहिले असून त्या मुदतीत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. या निवडणुकीत १२८ पैकी ६४ नगरसेवक राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºयांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात निवडणूक विभागाने पत्रेही पाठविली होती. त्यानुसार जुलै महिन्यात २२ जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल जमा केला आहे. त्यामध्ये वाढ होऊन आजपर्यंत ५८ जणांनी दाखला जमा केला आहे. तर, सहा नगरसेवकांनी अद्यापही दाखला जमा केला नाही. त्यापैकी एका उमेदवाराने एक सप्टेंबरपर्यंत न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. दाखला जमा करण्यासाठी २२ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे दाखला जमा करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.गायकवाड यांना दिलासाबुलढाणा, औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या जात पडताळणी समित्यांकडून या नगरसेवकांची जात प्रमाणपत्र पडताळणी दाखले महापालिकेत आलेले नाहीत. प्रमाणपत्र दाखला देण्यासाठी समित्यांना स्मरणपत्र देखील पाठविले आहे. पाच नगरसेवकांनी मुदतीच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. नगरसेवक पद रद्द झाल्यास भाजपाला मोठाधक्का बसू शकतो. कुंदन गायकवाड यांनी उच्च न्यायालयातून जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करण्यासाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून घेतली आहे.नगरसेवकांची अडचण वाढणारमुदतीत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाचे कुंदन अंबादास गायकवाड (प्रभाग एक, चिखली), यशोदा बोईनवाड (प्रभाग सहा धावडे वस्ती), कमल घोलप (प्रभाग १३, निगडी), शैलेंद्र मोरे (प्रभाग १९, आनंदनगर, दळवीनगर), मनीषा प्रमोद पवार (प्रभाग २३ थेरगाव), शशिकांत कदम (प्रभाग २९ पिंपळेगुरव) यांचे प्रमाणपत्र महापालिकेकडे आलेले नाही.