शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

भाजपमुळेच स्मार्ट सिटीची वेस्ट सिटी  - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:16 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी होते...

ठळक मुद्देभाजपचेच नगरसेवक महापालिकेत कचरा टाकून घरचा आहेर देताहेत.

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहर आमच्या काळात बेस्ट सिटी होते. त्यानंतर स्मार्ट सिटी झाले. आता मात्र सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीची वेस्ट सिटी केली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांनी केली. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पवार प्रथमच जाहीर कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते.  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयुर कलाटे, नाना काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, फजल शेख, उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, भाजपचेच नगरसेवक महापालिकेत कचरा टाकत आहेत. सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देत आहेत. शहरातील 15-15 दिवड कचरा उचलला जात नाही. नवीन गाड्या घेऊन देखील कचरा समस्या मार्गी लागली नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. " पवार म्हणाले,  कचऱ्याची निविदा मंजूर, रद्द आणि पुन्हा मंजुरीचा घोळ घातला. जनतेचे हित पाहिले नसल्याने शहर कचऱ्यात गेले. सलग दोन वर्षे स्वच्छ भारत अभियानात शहराची घसरगुंडी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSmart Cityस्मार्ट सिटीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस