शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

भाजपाचा स्वबळाचा नारा

By admin | Published: April 27, 2017 5:02 AM

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पिंपरीत झाली. त्यास निवडक ६८ सदस्य उपस्थित होते. या वेळी भाजपाला

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पिंपरीत झाली. त्यास निवडक ६८ सदस्य उपस्थित होते. या वेळी भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश, शेतकरी आत्महत्या, शिवसेनेची टीका, मध्यावधी निवडणूक, सरकारची धोरणे यावर चर्चा झाली. मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा, कामाला लागा, अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.पिंपरीतील पंचतारांकित हॉटेलात सकाळी भाजपातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. या वेळी महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकींमधील यशाबद्दल चर्चा झाली. या वेळी भाजपाच्या ध्येयधोरणावर चर्चा, तसेच पुढील कामकाजाचे नियोजन यावर चर्चा झाली. राज्यातील शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास मध्यावधी निवडणूक लागल्यास भूमिका काय असेल? यावर चर्चा झाली. सत्तेत असूनही शिवसेना भाजपावर टीका करते. त्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. याबाबत आक्रमक भूमिका घ्यायला हवी. विरोधकांना अंगावर येऊ देऊ नका? त्या वेळी काहींनी देशात आणि राज्यात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी करावी. स्वबळावर निवडणूक लढवावी, अशीही चर्चा झाली. त्यावर पक्षातील ज्येष्ठांशी चर्चा केली जाईल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करू, मध्यावधी निवडणूक लागल्यास आपण तयारीत रहायला हवे, असेही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांना सांगितले. सरकारच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा? अशाही सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गावागावांतील शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन चर्चा केली पाहिजे. प्रश्न जाणून घ्यायला हवेत. सरकारची शेतीविषयक धोरणे कशी चांगली आहेत, याचीही माहिती दिली पाहिजे, असेही पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. (प्रतिनिधी)