पिंपरीत देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे; काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:35 PM2022-03-07T19:35:13+5:302022-03-07T19:35:20+5:30
स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळा झेंडे दाखवून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
पिंपरी : स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळा झेंडे दाखवून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकणी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. दसरा चौक, चिंचवड येथे रविवारी (दि. ६) दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली.
काॅंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम (वय ५०), विजय ओव्हाळ (वय ४०), आबा खराडे (वय ४०), उमेश खंदारे (वय २७), बाबा बनसोडे (वय ४०) विशाल सरोदे (वय ३५), निर्मला कदम (वय ३५, सर्व रा. पिंपरी), महिला शहराध्यक्ष सायली नढे (वय ३०), किरण नढे (वय ३५, दोघेही रा. थेरगाव), ज्ञानेश्वर मलशेट्टी (वय ३०), किरण कोचकर (वय ५०, दोघेही रा. कळेवाडी), इस्माईल संगम (वय ४८), सतीश भोसले (वय ४५), निखिल भोईर (वय ३५, तिघेही रा. चिंचवड), विश्वनाथ जगताप (वय ४५), युवक काॅंग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे (वय ४०, रा. सांगवी), अर्जुन लांडगे (वय ३२), दिनकर भालेराव (रा. तळवडे), निर्मला खैरे (वय ४५), प्रिया कदम (वय ३०), शरद गायकवाड (वय ३५, रा. सजंयनगर, ओटास्किम, निगडी), पांडूरंग जगताप (वय ५५, रा. दत्तवाडी, आकुर्डी), आकाश शिंदे ( वय ३५), सुरज गायकवाड (वय ३०) व त्यांचे इतर कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार दादाराम जाधव यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा चौक, चिंचवड येथे माथाडी नेते आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचे उद्घाटन रविवारी (दि. ६) झाले. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यक्रमास्थळी आले असता काॅंग्रेस पदाधिकारी व कार्येकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव केला. रहदारीचा रस्ता अडवून काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या. मास्क न लावता, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन न करता निदर्शने केली. शासकीय परवानगी न घेता निदर्शने केली.