शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बीआरटी मार्गात काळी गुढी

By admin | Published: March 29, 2017 2:19 AM

निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा याकडे लक्ष

पिंपरी : निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सार्वजनिक वाहतूक सुधारणा समितीने मार्गात काळी गुढी उभारून लादलेल्या बीआरटीचा निषेध केला.या वेळी समिती समन्वयक काशिनाथ नखाते, समिती सदस्य संजय मालांडकर,अनिल बारावकर, विजय निकाळजे, इरफान चौधरी, सुरेश कोकीळ, संतोष गायकवाड, सखाराम केदार,ओमप्रकाश मोरया, नागनाथ लोंढे, संपत तिखे, सुशेन खरात, अप्पा साळवे आदी सदस्य उपस्थित होते. अपघातात झालेल्या मृत्यू, वाहनांचे नुकसान, तसेच आलेल्या अपंगत्वास मनपा प्रशासन जबाबदार आहे. प्रवासी व नागरिक यांच्यासाठी सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि अमजद सय्यद यांनी न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय मार्ग सुरू करण्यास प्रतिबंध घातला आहे. या मार्गावरील अत्यंत धोकादायक मॅर्ज इन आणि मॅर्ज आऊट या मार्गातून बाहेरील रस्ता भेदून जात असल्याने दररोज अपघात होण्याची शक्यता आहे. प्रत्येक चौकात बॅरिगेड्स तुटलेले आहेत. बसथांबे मोडकळीस आले आहेत. या सर्व बाबींचा विचार मनपाने न केल्यास तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा या वेळी समितीच्या वतीने देण्यात आला. (प्रतिनिधी)प्रवासी, वाहनचालक, अपंग, पादचारी यांच्या सुरक्षिततेचे कोणतेही उपाय न करता व सुरक्षा अहवाल फेटाळला, तरीही जागतिक बँक आणि तत्सम संस्था यांच्या मागणीनुसार केवळ जेएनएनयूआरएमचा निधी लाटायच्या उद्देशाने या मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी एप्रिलमध्ये हा मार्ग सुरू करण्याचे जाहीर केले आहे. हे पूर्णत: चुकीचे असून, मनपाच्या चुकांमुळे दररोज अपघात होत आहेत.