थेरगाव - येथील डीपी रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरखाली झाडेझुडपे वाढली आहेत. याच झुडपांवर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाचे फलक लावण्यात आला आहेत. त्यामुळे या अभियानाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. झुडपांमुळे येथे अपघाताचा धोका आहे. या रस्त्याच्या दुभाजकांमध्ये सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडे सुकली आहेत. काही झाडे गायब झाली आहेत. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.थेरगाव गावठाणातून राघवेंद्र स्वामी मठाकडे जाणाऱ्या डीपी रस्त्यावर उच्चदाब वीजवाहिनीचा टॉवर आहे. या टॉवरखाली झुडपे वाढली आहेत. या काटेरी झुडपांच्या फ ांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना या फांद्याचा अडथळा होतो. वाहनचालकांना येथे कसरत करावी लागते. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. तसेच हा टॉवर उच्चदाब वीजवाहिनीसाठी असल्याने या झुडपांमुळे येथील सुरक्षेस बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. झुडपांमुळे वाहनचालकांना विरुद्ध दिशेकडून येणारी वाहने सहज दिसून येत नाहीत. त्यामुळे येथे अपघातही झाले आहेत.शहरात सर्वत्र रस्ता दुभाजकांमध्ये सुशोभीकरणासाठी आणि वातावरण प्रदूषण मुक्त राहण्यासाठी प्रशासनाने झाडे लावली आहेत. नुसती झाडे लावण्यापुरतीच मोहीम न राबवता ती लावलेली झाडे जगविणेसुद्धा महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना करून प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेते. मात्र त्यानुसार अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नागरिक नाराज आहेत.थेरगाव गावठाणातील या डीपी रस्त्यावरील टॉवरखालील झुडपे हटवून तेथे वाहनचालकांसाठी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. मोठे रिफ्लेक्टर लावण्याची आवश्यकता आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. डीपी रस्त्याच्या दुभाजकांमध्ये नव्याने फुलझाडे आणि शोभेची झाडे लावणे आवश्यक आहे. वेळोवेळी पाणी न दिल्याने सध्याची फुलझाडे आणि अन्य झाडे सुकली आहेत. महापालिकेचा उद्यान आणि अन्य विभागांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी आणि अधिकारी याबाबत उदासीन आहेत. त्यांना संबंधितांकडून सूचना होऊन दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.अभियानाला महापालिकेकडूनच हरताळस्वच्छ आणि सुशोभित शहर या संकल्पनेनुसार केंद्र सरकारकडून स्वच्छ शहर अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येते. या अभियानाबाबत जनजागृती होण्यासाठी या सर्वेक्षणाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. असाच एक फलक या टॉवरखालील झुडपांवर लावण्यात आला आहे. हा फलक लावताना महापालिकेच्या कर्मचाºयांनी किंवा अधिकाºयांनी झुडपे हटविण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे जेथे सुशोभीकरणाला आणि स्वच्छतेला बाधा निर्माण होत आहे़ तेथेचे या अभियानाबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनालाच या स्वच्छ सर्वेक्षणाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते. परिणामी शहर सुशोभीकरणाला महापालिकेकडूनच हरताळ फासण्यात येत आहे.दुभाजक झाले भकासदुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावून शहर सुशोभीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी बहुतांश ठिकाणी याबाबत उदासीनता दिसून येते. थेरगाव गावठाणातील या डीपी रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली आहेत. मात्र या झाडांची निगा राखण्यात आलेली नाही. परिणामी दुभाजकातील झाडे सुकली आहेत. काही झाडे मोडून आणि तुटून पडली आहेत. त्यामुळे बरीचशी झाडे दुभाजकांतून गायब झाली आहेत. या परिस्थितीमुळे सुशोभीकरण करण्यात येणारे दुभाजक भकास झाले आहेत.
झुडपांत ‘स्वच्छ’चे फलक , सुशोभीकरणाबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 3:06 AM