शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

अखेर साकारणार बो-हाडेवाडी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:11 AM

पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनावर रिंग केल्याचे आरोप झाले होते.

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनावर रिंग केल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रस्ताव मागे घेऊन फेरप्रस्ताव सादर केला. बोºहाडेवाडी येथे १ हजार २८८ घरकुले बांधण्यासाठी येणाऱ्या ११२ कोटी १९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने विनाचर्चा मान्यता दिली. प्रकल्प बांधकामाच्या डीपीआर किमतीत बदल झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारचीही मान्यता घ्यावी लागणार आहे.महापालिका स्थायी समितीची बुधवारी सभा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. या सभेत ११६ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. बोºहाडेवाडीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. १ हजार २८८ घरे बांधण्यासाठी ११० कोटी १३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानुसार एका ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २४ कोटी २३ लाख म्हणजेच १३४ कोटी ३६ लाख रुपये असा कमी दर सादर केला. मात्र, हा दरही जास्त असल्याने त्यांना सुधारित दर सादर सांगितला होता. त्यानुसार त्यांनी १२३ कोटी ७८ लाख रुपये सुधारित दर सादर केला.दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियांमध्ये रिंग होत असल्याचा, तसेच वाढीव दराने निविदेस मंजुरी देण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली होती. प्राधिकरणातर्फे पेठ क्र. १२ मध्ये गृहप्रकल्प उभारले जात आहेत. यासाठी आलेल्या निविदांच्या तुलनेत महापालिकेच्या प्रकल्पासाठी वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले.>अकरा कोटींची होणार बचतजिप्सम प्लॅस्टरसाठी होणारा ११ कोटी ३० लाख रुपये खर्च वगळून १०९ कोटी ८८ लाख रुपये दर ठेकेदाराला कळविला. त्यानुसार ठेकेदाराने ११२ कोटी १९ लाख रुपयांत काम करण्याची तयारी दर्शविली. ही सुधारित किमतीची निविदा स्वीकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. मात्र, या बदलामुळे या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या किमतीत बदल झाला आहे. या कामास सुधारित तांत्रिक मान्यता घेण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड