बोपखेल : येथील गणेशनगर भागात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोºया होत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशनगर येथील आतापर्यंत झालेल्या चोºयांमध्ये दुचाकी गाड्यांचे टायर, सायकल दुकानांसमोरील लोखंडी फलक अशा अनेक चोऱ्या झाल्या आहेत. परंतु याबाबत कोणीही तक्रार दिलेली नाही. असे जरी असले, तरी पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीस गस्त होत नसल्याने एकप्रकारे चोरट्यांना अभय मिळत आहे. त्यामुळे आता जरी छोट्या चोºया होत असल्या, तरी मोठ्या चोऱ्या होण्याची शक्यता टाळता येत नाही. भुरट्या चोरट्यांचा वावर या परिसरात वाढला आहे.
पिंपरी-चिंचवडला नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यावर नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाटत होते; परंतु याउलट अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण होत चालले आहे. एकीकडे दिघी भागात एक पोलीस चौकी व एक पोलीस ठाणे असतानाही दिघी भागात काही दिवसांपूर्वी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. याच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बोपखेल येथील गणेशनगर भागात पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बोपखेलमधील काही भाग भोसरी पोलीस ठाण्यात येतो. मात्र भोसरी पोलीस ठाणे ते बोपखेल अंतर जास्त असल्याने भोसरी पोलीस बोपखेल भागात वेळेत पोहचू शकत नाहीत, असे येथील रहिवाशांनी सांगितले.सायकलही लंपास४गणेशनगर भागात तीस टक्के नागरिक सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यामुळे कुटुंबाला बोपखेल, गणेशनगर भागात ठेवून जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असतात. परंतु याचाच फायदा घेऊन चोर त्यांच्या सायकल व मौल्यवान वस्तू चोरी करीत आहेत. सैन्यदलात नोकरीनिमित्त आलेल्या शिपायाला आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी ठेवून आपले कर्तव्य बजवायला जावे लागते. त्यामुळे घरी केवळ महिला व लहान मुले असतात.
रात्रीच्या वेळी एकटी महिला घराबाहेर निघणे अशक्यच आहे. त्यामुळे चोरांचे फावते आहे. वाढत्या चोºया व महिलांच्या सुरक्षेसाठी गणेशनगर व बोपखेल भागात पोलीस गस्त वाढणे गरजेचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.गणेशनगर भागात पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे. गणेशनगर भागातील सुरक्षेबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी दिघी पोलीस नेहमीच कार्यरत आहेत.- विवेक लावंड, वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलीस ठाणेबाहेरगावाहून येणाºया कामगारांची संख्या वाढत आहे. परिणामी गुन्हेगारी वाढत आहे. गणेशनगर भागात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागात पोलीस गस्त वाढली पाहिजे.- जगन्नाथ घुले,स्थानिक, गणेशनगर