पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी सोमवारी एकमेव उमेदवारीअर्ज सादर केला. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपच्या १०, तर भाजपसंलग्न १ अपक्षाचा समावेश असल्याने त्यांची निवड निश्चित समजली जात आहे. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होणार आहे. अर्ज सादर करताना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर आझम पानसरे, महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘स्थायी’ अध्यक्षसाठी सीमा सावळे
By admin | Published: March 28, 2017 2:42 AM