शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रावण साम्राज्य टोळीतील दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:49 AM

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई; शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात गोळीबार करून झाले होते पसार

पिंपरी : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात गोळीबार करणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राजू चंढालिया (वय २०, रा. रावेत) आणि अशोक उत्तरेश्वर कसबे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याआरोपींची नावे आहेत ७ मार्च २०१९ रोजी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (रा. विकासनगर, देहूरोड) त्याच्या मित्रांसह शिवाजीनगर न्यायालय येथे गेला असताना न्यायालयाच्या आवारात त्याच्यावर रावण साम्राज्य टोळीतील रोहन चंढालिया, अक्षय साबळे व त्यांचा एक साथीदार यांनी दुचाकीवरून येऊन शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करून पसार झाले होते. त्याबाबत पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोक्कामध्ये फरार असलेला रावण साम्राज्य टोळीतील विनोद गायकवाड आणि त्याचे साथीदार यांना दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यामध्ये वाकड पोलिसांकडून अटक झाली होती. त्या गुन्ह्यामध्ये हनम्या शिंदे यांच्या टोळीचा सदस्य सूरज वाघमारे साक्षीदार होता. त्यामुळे ७ मार्च २०१९ रोजी सूरज वाघमारे दरोड्याच्या गुन्ह्याबाबत त्याच्या १५ ते २० साथीदारांसह शिवाजीनगर येथील न्यायालयात गेला होता. त्याचवेळी रावण साम्राज्य टोळीतील मोक्का आणि दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यामध्ये फरार असलेला अक्षय साबळे व रोहन चंढालिया, अशोक कसबे हे देखील दुचाकीवरून न्यायालय परिसरात आले होते. त्या वेळी अक्षय साबळे याने सूरज वाघमारे आणि त्यांच्या साथीदारांच्या दिशेने गोळीबार केला होता.दोघेही सराईतदोन्ही आरोपी रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असून, रोहन चंढालिया याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर निगडी, देहुरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एकूण चार गुन्हे दाखल आहेत. अशोक कसबे याच्यावर दुखापत केल्याप्रकरणी देहूरोड येथे आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी देहूरोड आणि चिखली पोलीस ठाण्यात असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.टोळ्यांमध्ये वर्चस्ववादमहाकाली टोळीचा म्होरक्या राकेश ऊर्फ महाकाली ढकोलिया याचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या टोळीमध्ये वर्चस्वासाठी फूट पडली. टोळीच्या चकमकीत ठार झालेल्या अनिकेत जाधवने विनोद गायकवाड याला बरोबर घेऊन रावण साम्राज्य नावाने स्वत:ची टोळी तयार केली होती. तसेच हनम्या शिंदे व सोन्या काळभोर यांनी एस. के. ग्रुप नावाची स्वतंत्र टोळी तयार केली. त्या दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून वारंवार वाद होऊ लागले. सन २०१७ मध्ये रावण साम्राज्य टोळीने हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये शिंदे थोडक्यात बचावला होता. त्यानंतर शिंदे व सोन्या काळभोर यांच्या टोळीने त्याचा बदला म्हणून रावण साम्राज्य टोळीचा प्रमुख म्होरक्या अनिकेत जाधव याचा खून केला. दोन्ही टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.