पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण समितीने स्थायी समितीपुढे सहा प्रस्ताव सादर केले होते. मात्र, या प्रस्तावात कोणती साहित्य खरेदी, प्रमाण किती खर्च किती याची माहिती नसल्याने स्थायी समितीने खरेदीला ब्रेक लावला आहे. आर्थिक तरतूद मान्यतेसह साहित्य खरेदीचे प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण समितीत साहित्य खरेदीचे प्रकरण गाजत असतानाच शिक्षण समिती सदस्यांनी स्थायी समितीपुढे साहित्य खरेदीचे सहा विषय सादर केले होते. त्याविषयात कोणतीही सुस्पष्टता नव्हती. किती विद्यार्थ्यांना लाभ होणार आणि खर्च किती येणार याबाबत माहिती नव्हती त्यामुळे या विषयांवर मडिगेरी यांनी प्रशासनास माहिती विचारली.
अशी होणार खरेदीपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेश खरेदी करणे. विद्यार्थ्यांचा पेहराव आकर्षक करण्यासाठी सन २०१९-२० या शैक्षणिक वषार्पासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हाफ जॅकेट खरेदी करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितासाठी सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्याकरीता कॉपर (तांबे) बाटली खरेदी करूत त्याचे वितरण करणे. उपक्रमशील बारा शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मध्यान भोजनासोबत पौष्टिक आहार म्हणून अंडी आणि सफरचंद, डाळींब, केळी असे फळ देण्यात येणार आहे. मेंदू तलख व्हावा, म्हणून विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे खासगी संस्थेतर्फे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दरवर्षी पाचशे रुपये खर्च असून, पुस्तक व साउंट ट्रॅक संचाची किंमत तीनशे रुपये आहे. शाळांमधील ग्रंथालयासाठी थेट पद्धतीने दोन लाखांची पुस्तके खरेदी केले जाणार आहेत. सर्व प्राथमिक शाळेत डिजिटल क्लास रूम सुरू केले जाणार आहेत. शिक्षण समितीचे सदस्य प्रस्ताव स्थायी समोर आले होते.विलास मडिगेरी म्हणाले, शिक्षण समितीचे सर्व प्रस्ताव सदस्य प्रस्ताव असून, त्यात सविस्तर माहिती नाही. निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करण्याचा सूचना केली.ह्णह्णनुसताच खरेदीचा सपाटासर्वसाधारण सभेत शिक्षण समितीच्या खरेदीवर टीका केली. शिक्षणाचा दर्जा घसरल्याने विद्यार्थी संख्या घटून अनेक शाळा बंद पडल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारणापेक्षा शिक्षण समिती व शिक्षण विभागाला साहित्य व सुविधा खरेदीमध्ये अधिक रस असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला होता.