पिंपरी : शहरात वाहन तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच धर्तीवर थेरगाव परिसरात ७ वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार बुधवारी(दि.२३मे) रात्री अकराच्या सुमारास नखातेनगरमध्ये घडला. महेश मुरलीधर तारू (वय ४३, रा. नम्रता हाऊसिंग सोसायटी, नखाते नगर, थेरगाव) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी करण शिंदे, चिक्या सूर्यवंशी,नवनाथ भातकुटे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी रात्री ११ च्या सुमारास दुचाकीवरून (एम एच १४, ए एफ ४६०१) आले. आरडाओरडा करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली. तिघे नम्रता हाऊसिंग सोसायटीत आले असता महेश यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनी मिळून महेश यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातून एक हजार रुपये हिसकावून नेले. तिघांनी सोसायटी आणि शिक्षक कॉलनीमधील ७ दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
तोडफोडीत थेरगावातील ७ वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:03 PM
स्थानिक पातळीवर स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठीच अशाप्रकारे वाहन तोडफोडीच्या घटना वारंवार घडवल्या जात आहे.
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ स्थानिक गुंडाच्या टोळक्यांकडून दहशत निर्माण व्हावी हा या तोडफोडीच्या घटनांमागे हेतू