पिंपरी : निगडी-दापोडी बीआरटीएस मार्ग एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. निगडी-दापोडी बीआरटीएस मार्ग गेल्या तीन ते चार वर्षांपासून तयार आहे. मात्र, नियोजनशून्य कामामुळे बीआरटीएस सुरू झालेली नाही. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी धुरा सांभाळताच तो डिसेंबरला चालू करू असे आश्वासन दिले होते. मात्र मार्गाच्या फाईलच वेळी पुढे न सरकणे, राजकीय विरोध अशा अनेक बाबींत हा मार्ग तयार असूनही वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे. तूर्तास २० मार्चपासून बीआरटीएस मार्ग दुचाकीसाठी खुला केला आहे.यावर आयुक्त म्हणाले, ‘‘बीआरटीएस मार्ग आम्ही तात्पुरता खुला केला असून, तो बीआरटीएससाठीच राखीव ठेवणार आहोत. कारण जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन केलेला शहरातील तो सर्वांत मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणार आहे. सध्या बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.’’(प्रतिनिधी)
बीआरटीला एप्रिलचा मुहूर्त
By admin | Published: March 25, 2017 3:54 AM