रावेत : किवळे येथील मुकाई चौकात सुरू असलेल्या ‘बीआरटीएस’ टर्मिनलचे काम जवळपास पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.येथून पुण्यातील विविध ठिकाणी आणि पिंपरी- चिंचवड भागात जाण्यासाठी या टर्मिनलवरून बस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. या ठिकाणी अनेक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. सध्या येथून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जाण्यासाठी नागरिकांना बस उपलब्ध नाहीत, त्या करिता पीएमपीचे अनिश्चित बसथांबे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या बसस्थानकांवर जावे लागते. मुकाई चौकातील टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बसथांब्यावर शेडचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसात बसची वाट पाहत थांबावे लागते. मात्र या टर्मिनलमुळे ही समस्या दूर होणार आहे. मात्र हे टर्मिनल केव्हा सुरू होणार, या प्रतीक्षेत परिसरातील प्रवासी आहेत. (वार्ताहर)मुकाई चौकातील अत्याधुनिक टर्मिनल परिसरातील वैभवात भर घालत असून, येथून सुरू होत असलेल्या औंधपर्यंतचा बीआरटीएस मार्गामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार असून, या मार्गामुळे वेळही वाचणार आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून सुसज्ज असलेला बीआरटीएस मार्ग केव्हा सुरू होतो याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.श्रीकांत धनगर, अध्यक्ष जय मल्हार प्रतिष्ठान
बीआरटीएस टर्मिनल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 10, 2015 5:01 AM