शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

चर्चेविना पालिकेचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Published: June 16, 2017 4:50 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चर्चेविना मंजूर केला. महापौर नितीन काळजे यांनी अठरा मिनिटांत ४ हजार

- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चर्चेविना मंजूर केला. महापौर नितीन काळजे यांनी अठरा मिनिटांत ४ हजार ८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. सभाशास्त्राचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. अर्थसंकल्पावर बोलू न देणे ही लोकशाहीची गळचेपी झाली असून, भाजपाची हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या सदस्यांनी सभात्याग केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. निवडणुकीमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अर्थसंकल्प मंजूर करून कार्यवाही सुरू केली होती. दरम्यान, महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर स्थायी समितीची निवड झाल्यानंतर आयुक्तांनी अर्थसंकल्प सभापती सीमा सावळे यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्यानंतर त्यावर स्थायी समितीत चर्चा होऊन अंतिम मंजुरीसाठी दोन मदिन्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला. त्यासाठी आज विशेष सभा बोलविण्यात होती. दुपारी दोनला सर्वसाधरण सभा सुरु झाली. सुरूवातीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नगर सचिव उल्हास जगताप यांनी सभेचे कामकाज कसे असेल याची माहिती दिली. स्थायी समिती सभापती अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतील. त्यावर चर्चा, नंतर उपसूचना स्वीकारून मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले. सभागृहात प्रथमच अर्थसंकल्प सादरीकरणासाठी दोन स्क्रीन लावण्यात आले होते. तसेच महापौर, आयुक्त आणि स्थायीसमिती सभापतींसमोर संगणक ठेवण्यात आले होते. सावळे यांनी सुमारे पंधरा मिनिटांच्या मनोगतात अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगितली. चर्चा सुरू होण्यापूर्वीच भाजपा सदस्य नामदेव ढाके यांनी बोलण्यासाठी हात वर केला. सभा चालवायचा महापौरांचा अधिकार अर्थसंकल्पाला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. त्यास सुजाता पालांडे यांनी अनुमोदन दिले आणि महापौरांनी क्षणाचाही विलंब न लावता, त्यास मंजुरी दिली. त्यावर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आक्षेप घेतला. सभाशास्रचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसचिवांंनी खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यावर जगताप म्हणाले, की सभा कशी चालवायची हा महापौर यांचा अधिकार आहे. सभागृहात बोलू न दिल्याने सभागृहातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. पारदर्शकतेचे पहारेकरी महापालिकेतील सत्तारुढ भाजपाने अर्थसंकल्पीय चर्चेचा खेळखंडोबा केला. महापालिकेच्या ३५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विनाचर्चा अर्थसंकल्प मंजूर केल्याचा विक्रम भाजपाने आपल्या खात्यावर नोंदविला. एवढेच नव्हे, तर विरोधकांनी सभात्याग केल्यावरही भाजपाचे नवोदित नगरसेवक आपल्याच कोडकौतुकात रममाण झाले, तर शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेने भाजपाच्या या दडपशाहीचा धिक्कार केला.