शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बिल्डरचा ‘रात्रीस खेळ चाले’

By admin | Published: July 04, 2017 3:39 AM

विकासनगर येथील इंदिरा कॉलनी भागातील महापालिकेने चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून डांबरीकरण केलेला रस्ता एका बांधकाम व्यावसायिकाने

लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : विकासनगर येथील इंदिरा कॉलनी भागातील महापालिकेने चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून डांबरीकरण केलेला रस्ता एका बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या कोणत्याही विभागाची पूर्वपरवानगी न घेता शनिवारी रात्री सुमारे तीनशे फूट रस्ता खोदल्याच्या प्रकार उघड झाला आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने खोदल्याची नागरिकांसमोर चूक कबूल करीत सकाळी चूक दुरूस्तीचा प्रयत्न केला. सकाळी घाईघाईत रस्ता बुजविण्याचे काम केले.विकासनगर भागातील इंदिरा कॉलनी भागात एका बांधकाम व्यावसायिकाने एका मोठ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. बांधकाम केलेल्या इमारतीसमोर महापालिकेची भुयारी गटार योजनेची वाहिनी असताना त्याठिकाणी जोड देण्याऐवजी संबंधित इमारतीपासून इंदिरा कॉलनीतील सुमारे दोनशे फूट मुख्य रस्ता खोदण्यास शनिवारी रात्री सुरुवात केली, नागरिकांना सुरुवातीला महापालिकेचे काम असल्याचे भासविण्यात आले. खोदकाम करणारा यंत्र चालक नागरिकांनाच दमबाजी करीत होता. नागरिकांनी त्यास रस्ता खोदण्याची परवानगी काढली आहे का? असा जाब विचारला. त्यानंतर त्याने काम थांबवून संबंधित बांधकाम व्यावसायिकास कळविले. दरम्यान महापालिकेचे काम रात्री उशिरा कसे सुरु ठेवले याबाबत काहींना शंका आल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दूरध्वनीवरून चौकशी केली असता रस्ता खोदण्यास परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नागरिकांनीच काम ताबडतोब थांबवावे, रस्ता पुर्ववत तयार करून द्यावा, असे त्यास सुनावले. नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकाने रस्त्याचे खोदकाम बंद करून झालेली चूक मान्य करीत खोदलेला रस्ता माती टाकून रातोरात बुजवून टाकला असून रविवारी सकाळी खोदलेल्या रस्त्यावर खडी व सिमेंट टाकून खडे बुजविण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे संबंधितांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरुण गोंटे, गणेश चव्हाण, रविंद्र कडू, राजेश मांढरे, अरुण आंबेकर, नितीन कुऱ्हाडे, संतोष नाईक, गणेश गपट, संदीप आगळे, अजय रॉय, लेखराज कोहली, जयेश कवडे आदी नागरिकांनी केली आहे.किवळे येथे बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेचा रस्ता खोदला. अशी तक्रार नागरिकांकडून प्राप्त झाली. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या भुयारी गटाराला जोड देण्याबाबत विचारणा केली होती . मात्र त्यासाठी रितसर परवानगी पालिकेकडून देण्यात आलेली नव्हती - एस डी बंडगर, अभियंता, भुयारी गटार विभाग, अ क्षेत्रीय कार्यालयमहापालिकेच्या स्थापत्य विभागाने रस्ता खोदण्याची परवानगी दिलेली नसून रस्ता अनधिकृतपणे खोदला असल्याने योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून महापालिका नुकसान भरपाई वसूल करणार आहे. - एच पी बन्सल, उपअभियंता , स्थापत्य विभाग, अ क्षेत्रीय कार्यालय