पिंपरी : बनावट खरेदीखतप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बिल्डर नरेश वाधवानी यांना पिंपरी न्यायालयाने २४ डिसेंबरला जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांचे वकील मयूर शांतीलाल लोढा यांनी दिली.बनावट खरेदीप्रकरणात वाधवानींसह आणखी दोन जणांवर चिंचवड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दोन आरोपींविरुद्ध कारवाई झाली. मात्र, वाधवानी यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर वाधवानी २३ डिसेंबरला चिंचवड पोलिसांकडे हजर झाले. शनिवारी दुपारी एकला मोरवाडी न्यायालयात हजर झाले. त्यांना रविवारपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याबद्दल युक्तिवाद केला. कोर्टाने युक्तिवाद ग्राह्य धरून पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. याबाबत जामीन अर्ज कोर्टात दाखल केला असता, रविवारी कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला. हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट सह्या करून खरेदीखत केल्याप्रकरणी वाधवानी यांच्यासह विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांच्याविरुद्ध शांताराम बर्डे यांनी तक्रार दिली होती.
बिल्डर वाधवानी यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:03 AM