सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:50 PM2018-02-09T15:50:12+5:302018-02-09T15:55:47+5:30

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.

Bulldozers on common man house, BJP's building condonation; Pimpri Congress-NCP allegations | सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

Next
ठळक मुद्देकाही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनास दिले होते पुरावेप्रशासनास हाताशी धरून सत्ताधारी नागरिकांवर करीत आहेत जुलूम : सचिन साठे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोजर फिरविला जातो. तर, दुसरीकडे कारवाई करण्याची मागणी करुनही भाजप कार्यकर्त्यांच्या अनधिकृत दुकानांवर, घरांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप, शहराध्यक्ष साठे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या दुटप्पीपणाचा त्यांनी तीव्र निषेध केला.  
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर शहरात विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या नातेवाईकांच्या बांधकामांवर करवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जगताप यांनी महापालिका प्रशासनास पुरावे दिले होते. त्यानंतर प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. नवी सांगवी पाठोपाठ कारवाई सुरू केली. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी लावली होती. 

गोरगरिबांच्या घरावर हातोडा, काँग्रेसकडून निषेध
पिंपळेगुरव, सांगवी परिसरातील भाजप नेते, लोकप्रतिनिधींच्या व्यावसायिक बांधकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांची बांधकामे शाबूत ठेवून सर्वसामान्यांच्या रहिवासी बांधकामावर बुलडोझर फिरविला जात आहे. महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा, गंभीर आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. अनधिकृत बांधकामाचे पुरावे दिल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. 
पिंपळे गुरवमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरविला जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी लेखी तक्रार करुन, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊनही पिंपळे निलख विशालनगरमधील बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका वाईन शॉपवर कारवाई केली जात नाही. हे दुकान भाजपकडून निवडणूक लढविलेल्या एका व्यक्तिच्या मालकीचे असल्यानेच तक्रार करुनही कारवाई होत नसल्याची बाब काँग्रेसने पत्रकार परिषदेत उघडकीस आणली. 
शहराध्यक्ष साठे म्हणाले, की महापालिकेत सुडाचे राजकारण सुरू आहे. प्रशासनास हाताशी धरून सत्ताधारी नागरिकांवर जुलूम करीत आहेत. महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही. केवळ गोरगरिबांच्या घरांवर हातोडा चालवित आहे. विशालनगरमधील एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे बांधकाम करून त्यात वाईन शॉप सुरू केले आहे. तक्रार करूनही महापालिका प्रशासन पाठीशी घालत आहे. प्रशासनाच्या या कारवाईतील दुजाभावाचा आम्ही निषेध करतो.

Web Title: Bulldozers on common man house, BJP's building condonation; Pimpri Congress-NCP allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.