शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

बुलेट रायडर्सला 'फटाक्यां'ची हौस भारी ; २५ लाखांचा दंड वसूल तरी 'मस्ती'ठरतेय शिरजोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:02 IST

वाहनांचे बुलेटचे फटाके ठरताहेत डोकेदुखी

नारायण बडगुजर- 

पिंपरी : कर्णकर्कश्य हाॅर्न तसेच सायलेन्सरचा आवाज असलेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. तरीही काही बेशिस्त काही नागरिकांनी त्यांच्या वाहनांचे माॅडिफिकेशन केले आहे. फटाक्यांचा आवाज काढणारे बुलेटवाले अद्यापही शहरात आहेत. असे वाहनचालक रात्री मोकळ्या रस्त्यांवरून भरधाव वाहन चालवून कर्णर्कश्य हाॅर्न वाजवितात तसेच बुलेटवालेही सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढतात.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यात वाहनाचे माॅडिफिकेशन करणारे वाहनधारक रडारवर आहेत. त्यांच्यावर कारवाई करून आर्थिक दंडही आकारत आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर दिवसभर कारवाई केली जाते. वर्दळ व वाहनांअभावी रात्री मोकळ्या असलेल्या रस्त्यांवर बुलेटवाले रात्री सायलेन्सरने फटाक्यांचा आवाज काढून शहरवासियांची झोपमोड करीत आहेत.भरवस्ती, रुग्णालय, बाजारपेठ, चाैक तसेच वर्दळीच्या ठिकाणी काही दुचाकीस्वार भरधाव दुचाकी चालवितात. तसेच विचित्र आवाजाचे हाॅर्न वाजवून गर्दीचे लक्ष केंद्रीत केले जाते. यातून वायू प्रदूषण केले जाते. तसेच सार्वजनिक शांततेताचाही भंग होतो. हे प्रकार रोखण्यासाठी मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

म्यझिकल हाॅर्न लावणे पडले महागातशहरातून पुणे-मुंबई, पुणे - नाशिक, बेंगळूरू-मुंबई हे महामार्ग गेले आहेत. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा मार्ग एमआयडीसीतून गेला आहे. या मार्गांवर बस, ट्रक, कंटेनर, अशा अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. यातील बहुतांश वाहनांना म्युझिकल हाॅर्न बसविलेले असतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील काही दुचाकी, टेम्पो व इतर वाहनांनाही असे हाॅर्न बसविल्याचे दिसून येते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे असे हाॅर्न बसविणे या वाहनचालकांना महागात पडले आहे.

बेशिस्त चालकांवर सुरूच होणार....

वाहनचालकांनी कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करू नये. यातून त्यांच्या स्वत:सह इतरांच्याही सुरक्षेला धोका असतो. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहणार आहे.- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग

वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई                                                     कर्णकर्कश्य व म्युझिकल हाॅर्न वाजविणे : २०२० - २२९  - एक लाख १० हजार ३००२०२१ (१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी) - ५२ - २६ हजारबुलेट सायलेन्सर माॅडिफिकेशन - २०२० - २५५२ - २५ लाख ५२ हजार२०२१ (१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी) - ६४१ - सहा लाख ४१ हजार

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीस