पिंपरी : महापालिका निवडणूकीसाठी उमदेवारी न मिळाल्याने अनेकांनी दंड थोपटले होते. मात्र, काँग्रेस,राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी बंडोबांची मनधरणी करून अर्ज मागे घ्यायला लावले आहेत. त्यात माजी महापौर अनिता फरांदे, माजी उमहापौर जगन्नाथ साबळे, स्थायी समितीचे माजी सभापती सूर्यकांत थोरात, माजी विरोधी पक्षनेते शरद बारहाथे, नगरसवेक अरूण बोºहाडे, सविता साळुंखे, अमिना पानसरे, अजय सायकर, सोनाली जम, नीलेश पांढरकर, शेखर ओव्हाळ, छाया साबळे, किरण मोटे, शुभांगी लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, माजी उपसभापती लता ओव्हाळ, माजी नगरसेवक राजू दुर्गे, रघुनंदन घुले, वैशाली उबाळे, गणेश भोंडवे, मीना पाटील, सोजरबाई ससाणे, स्मीता गुंजकर, मसुकांत शिंदे, कमरूनिसा खान, हमीद शेख, हरीभाऊ तिकोण, शकुंतला भाट, ललीता पाटील, सिद्धेश्वर बारणे, राजू लोखंडे, सुरेखा साळुंखे, सावित्री गारवे यांनी माघार घेतली.