पिंपरी : दरवाजाला कुलूप, कडीकोयंडा न तोडता घरातून सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि.१७) घडली होती. ही चोरी बनावट चावीच्या साह्याने केली असावी, असा अंदाज बांधत तपासाला गती दिली. तसेच पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे उमेश रमेश भोसले (वय २८, रा. आवसा, लातूर) याला अटक केली. आरोपीने ओळखीचा फायदा घेत बनावट चावीच्या साह्याने घर उघडून चोरी केली. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दीड लाखाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोदल दिलीप सावंत यांच्या घरी सोमवारी (दि.१७) चोरी झाली. चोरट्याने सोन्याचे गंठण, मिनी गंठण, ठुशी अंगठी असा ऐवज चोरून नेला. घराला कुलूप असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जाते होते. याप्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याददेखील दिली होती. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचून आरोपी उमेश रमेश भोसले याला ताब्यात घेतले.
पोलिसांना त्याच्याकडे सर्व दीड लाख रुपये किमतीचे दागिने मिळून आले. त्याने ओळखीचा फायदा घेत बनावट चावी बनवून ही चोरी केल्याचे पोलीस तपासात सांगितले. तब्बल दीड लाख रुपये किमतीच्या सोन्यासह चोरट्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दीड लाखाचे सोन्याचे दागिने जप्त केले.