कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावरकामशेत खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रेलरला धडकून झालेल्या अपघातात बस मधील दोन जण गंभीर जखमी झाले असून इतर प्रवासी व ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( दि. १२ ) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर खामशेत गावाजवळ खिंडीत मुंबई-पुणे महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची कुर्ला ते पिंपळगावरोठा बसच्या ( एमएच. १४ बीटी. १८९३ ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने चढावर पुढे जाणाऱ्या ट्रेलरला (एमएच. ४३ यु. ८५२४ ) धडकून हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही .मात्र, बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी व इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींची नावे समजू शकली नाही. अपघातानंतर महामार्गावर काही वेळ लांबपर्यंत वाहतूक कोंडी झाली. कामशेत वाहतूक पोलीस हनुमंत माने यांच्यासह, संतोष घोलप, गणेश गव्हाणे, समीर शेख, चितन बोंबले, सतीश ओव्हाळ, नितेश चव्हाण व आयआरबी कर्मचारी यांनी एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नाने क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग खुला करण्यात आला.
कामशेत खिंडीत बसचा अपघात ; दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:28 PM
जुना मुंबई- पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रेलरला धडकून हा अपघात घडला.
ठळक मुद्देअपघातात जीवितहानी नाही मात्र, बसचे मोठे नुकसान महामार्गावर काही वेळ लांबपर्यंत वाहतूक कोंडी