शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी, हिंजवडी ते शिवाजीनगर माग, जून २०१८ मध्ये कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:36 AM

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ कि.मी. लांबीच्या व सुमारे ८ हजार ३१३ कोटी किमतीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.या प्रकल्पामुळे हिंजवडी येथील आयटी पार्क आता पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडला जाणार आहे.

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ कि.मी. लांबीच्या व सुमारे ८ हजार ३१३ कोटी किमतीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.या प्रकल्पामुळे हिंजवडी येथील आयटी पार्क आता पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडला जाणार आहे.या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर (पीपीपी) पीएमआरडीएमार्फत अंमलबजावणी केली जाईल. केंद्र व राज्य शासनाकडून या प्रकल्पास प्रत्येकी २० टक्के निधी मिळणार होता. मात्र, राज्याचा हिस्सा पीएमआरडीएकडूनच उभा केला जाणार आहे. तर उर्वरित ६० टक्के निधी खासगी उद्योजकांच्या सहभागातून उभा केला जाईल. हिंजवडी येथे होणारी वाहतूक कोंडी या प्रकल्पामुळे कमी होईल. तसेच माहिता, तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. मेट्रोमुळे नागरिकांना प्रदुषणमुक्त, वातानुकिलीत व सुरक्षित प्रवासाची सोय होणार आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणानुसार राबविण्यात येणार आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर या प्रकल्पादरम्यानची सर्व स्थानके अद्यावत असतील व मेट्रोचे संचालन व नियंत्रण हे आधुनिक वायरलेस तंत्रज्ञानाच्या आधारे होईल. ही मेट्रो हिंजवडी, वाकड, बालेवाडी, पुणे विद्यापीठ या मार्गे शिवाजीनगर येथे येईल. तसेच पुण्यातील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो प्रकल्पाला ही मेट्रो शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या जवळील प्रकल्पाला जोडली जाईल.पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून रोख रक्कम मिळणार आहे.त्यामुळे मेट्रोच्या काही कामांना सुरूवात करता येईल. मात्र,या प्रकल्पासाठी निविदा दाखल करणा-यांपैकी तीन विकसकांमधून एकाची निवड केली जाईल. पीएमआरडीएने शासनास सादर केलेल्या संपूर्ण प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे.करार प्रक्रियेस तसेच तिकीटीसंदर्भातील नियमावलीसही मंत्रीमंडळाकडून मान्यता मिळाली आहे. पुढील दोन-तीन वर्षात या प्रकल्पाच्या परिसरातील जमिन विकसकांना देवून त्यातून निधी उभा केला जाईल.- किरण गित्ते, अध्यक्ष,पीएमआरडीएमेट्रोविषयी मंत्रिमंडळाचे निर्णयया मेट्रो प्रकल्पासाठी पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली.८ हजार ३१३ रुपये एवढ्या खर्चाच्या प्रकल्पाची खासगीकरण तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येईल.प्रवास भाडे पुणे मेट्रो मार्ग १ व मार्ग २ प्रमाणे ठेवण्यात येईल.पुढील एका वर्षात एकात्मिक वाहतूक समिती स्थापन करण्यात येईल.व्यवहार्यता तफावत निधीपोटी केंद्र शासन १ हजार १३७ कोटी अर्थसाहाय्य करणारराज्य शासनाच्या ८१२ कोटींऐवजी प्राधिकरण ही रक्कम जामिनीच्या विकासातून निर्माण करेल.हा प्रकल्प पूर्णपणे नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला.प्रकल्पामुळे बाधित होणाºया लोकांचे पुनर्वसन मुंबई परिवहन पुनर्वसन धोरणानुसार होईल.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे