शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द, आयुक्तांनी झुगारला दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:58 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य कुंदन गायकवाड यांचा जातदाखला बुलडाणा पडताळणी समितीने अवैध ठरविल्याचा आदेश महापालिकेला मिळाला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य कुंदन गायकवाड यांचा जातदाखला बुलडाणा पडताळणी समितीने अवैध ठरविल्याचा आदेश महापालिकेला मिळाला असून, त्यांचे पद रद्द केल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. या निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड चिखली प्रभाग क्रमांक एकमधून भाजपाच्या उमेदवारीवर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नितीन रोकडे यांनी गायकवाड यांच्या जातदाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जातदाखला अवैध असल्याचा निर्णय बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी दिला. जातपडताळणी समितीचा आदेश येऊनही गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास पालिका अधिकारी टाळाटाळ होत होती.भाजपाच्या तीन नगरसेवकांवर टांगती तलवारनगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे. तसेच राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या तीन नगरसेवकांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला सादर केला नाही. त्यांच्या वकिलांनी स्थगिती मिळाली असल्याचे पालिकेला दूरध्वनीवरून सांगितले आहे. दूरध्वनीवरच पालिकेच्या अधिकाºयांना कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, यशोदा बोईनवाड यांनी सहा महिने, कमल घोलप यांनी चार सप्टेंबरपर्यंत आणि मनीषा पवार यांनी चार महिन्यांच्या मुदतवाढीचा आदेश उच्च न्यायालयातून मिळविला आहे.२२ आॅगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती. या मुदतीत चार जणांनी न्यायालयातून मुदतवाढीचा आदेश मिळविला. त्यांपैकी गायकवाड यांचे प्रमाणपत्र अवैध असल्याची माहिती निवडणूक विभागाला कळविली होती. या संदर्भातील आदेश प्राप्त झालेला नव्हता. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया म्हणून गायकवाड यांच्याबाबतच्या दाखल्याबाबत मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याचे काम सुरू होते. अशा प्रकरणांमध्ये पडताळणी समितीच्या आदेशाला कोणी स्थगिती मिळविली आहे का, याबाबत कायदेशीर माहिती घेणे गरजेचे असते. त्यामुळे आज सायंकाळी गायकवाड यांचे पद रद्द केल्याचे आदेश पारित केले असून, कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त